Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान मोदींच्या सेवा, विकास आणि राष्ट्रउभारणीसाठी समर्पित 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनावर प्रकाश टाकणारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

पंतप्रधान मोदींची 25 वर्षांची सार्वजनिक कारकीर्द ही सेवा, विकास आणि राष्ट्रउभारणीचा त्यांचा प्रवास दर्शवते, असे एकनाथ शिंदे  यांनी या लेखात लिहिले आहे.

गुजरातपासून दिल्लीपर्यंत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कल्याण आणि सांस्कृतिक वारसा यांवर लक्ष दिल्यामुळे भारताच्या विकासाच्या प्रवासाला आकार मिळाला आहे; असे त्यात त्यांनी अधोरेखित केले आहे. तसेच, यापुढील टप्पा अधिक मजबूत तसेच आत्मनिर्भर भारताच्या दूरदृष्टीसह ‘विकसित भारत 2047’ कडे पाहतो, असेही त्यात त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ‘एक्स’वर पोस्ट केले आहे:

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे ही सेवा, विकास आणि राष्ट्रउभारणीचा प्रवास दर्शवतात, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे.

“गुजरातपासून दिल्लीपर्यंत, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, समृद्धी आणि सांस्कृतिक वारसा यांवर दिलेल्या लक्षामुळे भारताच्या विकासाच्या प्रवासाला आकार मिळाला आहे.

अधिक सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडणारा पुढील टप्पा ‘विकसित भारत 2047’ याकडे आपले लक्ष वेधून घेत आहे.”

नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai