Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान लोकसभेत : जीएसटी टीम इंडियाचे परिवर्तनच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल


पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) उल्लेख “टीम इंडियाचे महत्वपूर्ण पाऊल”, “परिवर्तनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल” आणि “पारदर्शकतेच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल” असा केला.

लोकसभेमध्ये वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा सुरु असतांना ते बोलत होते.

पंतप्रधानांनी 8 ऑगस्ट तारखेची नोंद केली आणि 1942 ची आठवण करुन दिली.

याच दिवशी महात्मा गांधीनी, “भारत छोडो चळवळीची” हाक दिली होती. ते म्हणाले की, आज देशाने कर दहशतवादापासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.

वस्तू आणि सेवाकर विधेयक मार्गस्थ होणे हा कोणत्या एका पक्षाचा विजय नसून तो भारतीय लोकशाहीचा विजय आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

वस्तू आणि सेवा करावर झालेल्या चर्चेविषयी आठवण करुन देताना पंतप्रधान म्हणाले की, आम्ही या चर्चेसाठी सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग या दोघांना आमंत्रित केले होते. या दोघांपैकी एक लोकसभेमध्ये सदस्य आहे तर एक राज्यसभेमध्ये सदस्य आहे.

मोदी म्हणाले की, जीएसटीला मिळालेली सर्वसंमती हेच दर्शवते की भारतात राष्ट्रनिती ही राजनिती पेक्षा उच्च आहे.

“एक भारत” या सर्वोत्कृष्ठ दागिन्यातील इतर जसे रेल्वे, अखिल भारतीय सेवा, भारत नेट सागरमाला या सर्व मोत्यांमध्ये आता जीएसटीचा आणखी एक मोती जोडला जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

जीएसटीमुळे आता करप्रणालीत एकसूत्रता आणणे शक्य होईल असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, या नवीन प्रणालीमध्ये ग्राहक सर्वोच्च स्थानी आहे. मनुष्य, पैसा, मिशन, माल आणि वेळेचा समंजस वापर करणे हे सबळ आर्थिक योजनेचे महत्वपूर्ण तत्व आहे असे सांगत पंतप्रधान म्हणाले की हे तत्व साध्य करण्यासाठी जीएसटी सहाय्य करेल.

जीएसटीचे बलस्थान हे तंत्रज्ञान असल्यामुळे अचूक माहिती मिळायला मदत होईल. महागाईवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी जीएसटीमधून वगळण्यात आल्या आहेत. जीएसअीमुळे भ्रष्टाचार कमी व्हायला मदत होईल असे ते म्हणाले.

जीएसटीमुळे छोटया व्यापाऱ्यांना देखील फायदा होईल आणि जीएसटीमुळे ते अधिक सुरक्षित होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

गरिबी निर्मुलनासाठी आम्ही गरीबांच्या आर्थिक आणि शैक्षणिक सबलीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

BG/SM/AK