Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान विकास पैकेज अंतर्गत पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर व चंबा क्षेत्रातील विस्तापित कुटुंबांसाठीच्या पुनर्वसन पैकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर तसेच चंबा क्षेत्रातील ३६,३८४ विस्तापित कुटुंबांच्या २००० कोटी रुपयांच्या केंद्रीय मदतीला मान्यता दिली. नोव्हेंबर २०१५ मध्ये जम्मू-काश्मीर- २०१५ साठी जाहीर झालेल्या पंतप्रधान विकास पैकेज अंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे.

पैकेज अनुसार प्रत्येक विस्थापित कुटुंबाला उत्पनाचे साधन मिळविण्यासाठी आणि आपला चरितार्थ चालवण्यासाठी ५.५ लाख रोख रक्कम देण्यात येणार असून पात्र कुटुंबाना थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून वितरीत करण्यासाठी ही रक्कम जम्मू काश्मीर राज्य सरकारला दिली जाईल.

पी आई बी. /बी. गोखले / एस .म्हात्रे