Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पठाणकोट हवाई तळाला पंतप्रधानांची भेट

पठाणकोट हवाई तळाला पंतप्रधानांची भेट

पठाणकोट हवाई तळाला पंतप्रधानांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधल्या पठाणकोट हवाई तळाला भेट दिली. या हवाई तळावर नुकताच दहशतवादी हल्ला झाला होता.

संरक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी दहशतवादाला आळा घालण्याबाबत आणि अशाप्रकारचा गंभीर दहशतवादी हल्ला हाताळण्यासाठी परिसर पिंजून काढण्याबाबतचे विस्तृत सादरीकरण केले.

पंतप्रधानांनी हवाई तळावरील संबंधित ठिकाणांना भेट दिली तसेच सीमा भागाचे हवाई सर्वेक्षणही केले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, लष्कर, हवाई दल, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख या भेटीच्या वेळी उपस्थित होते.

J.Patankar/S.Tupe/M.Desai