पीएम्इंडिया
बहरीन, कुवेत, नेपाळ, दक्षिण कोरीया, व्हिएतनाम आणि ब्रिक्स देशांबरोबर युवा आदान-प्रदान कार्यक्रमांसंदर्भात सामंजस्य करार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली.
या कार्यक्रमामुळे विविध देशातील युवकांना आपल्या कल्पना आणि मुल्यांची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते. तसेच आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन विकसित होण्याच्या दृष्टीने अशाप्रकारचे आंतरराष्ट्रीय युवा आदान-प्रदान कार्यक्रम उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर विविध देशातील नागरिकांमधे आदान-प्रदानपर उपक्रमांमुळे शांतता आणि सामंजस्य वाढीला लागून मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत होतात.
M.Pange / S. Tupe / M. Desai