पीएम्इंडिया
पर्यटन क्षेत्रात भारत आणि मालदीव यांच्यातले सहकार्य दृढ करण्यासाठी भारत आणि मालदीवच्या पर्यटन विभागात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने संमती देण्यात आली.
मालदीव बरोबर झालेल्या या सामंजस्य करारामुळे या महत्वाच्या स्रोत बाजारातून येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. भारतासाठी महत्वपूर्ण पर्यटन उत्पादन बाजारपेठ म्हणून मालदीव पुढे येत आहे.
पर्यटन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी पर्यटनविषयक माहितीचे आदानप्रदान, मनुष्यबळ विकास सहकार्यासाठी आदान-प्रदान कार्यक्रमांची निर्मिती यावर या सामंजस्य करारात भर देण्यात आला आहे.
N. Chitale / B. Gokhale