पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 15 जून 2026
पश्चिम आशियातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या सहमतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
या संघर्षामुळे जगभरात गंभीर आर्थिक कोंडी निर्माण झाली असून अनेक देशांना जीवितहानीचे नुकसान सोसावे लागले असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
या दोन्ही देशांमधली सहमती प्रत्यक्षात अंमलात आल्याने संघर्षग्रस्त प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यास मदत होईल, तसेच सागरी वाहतूक आणि व्यापार स्वातंत्र्याचीही सुनिश्चित होईल, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
उर्वरित मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चेतून एक शाश्वत आणि अंतिम तोडगा निघेल अशी आशा भारताला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
पश्चिम आशियातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या सहमतीचेमी स्वागत करतो. या संघर्षामुळे जगभरात गंभीर आर्थिक कोंडी निर्माण झाली होती आणि अनेक देशांमध्ये जीवितहानी झाली होती.
ही सहमती प्रत्यक्षात अमलात आल्याने संघर्षग्रस्त प्रदेशात शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित होण्यास मदत होईल, तसेच सागरी वाहतूक आणि व्यापार स्वातंत्र्याची सुनिश्चिती होईल, अशी आशा भारताला आहे. उर्वरित मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चेतून एक शाश्वत आणि अंतिम तोडगा निघेल याकडे अशी आशा आम्हाला आहे.
I welcome the understanding reached between the United States and Iran on ending the conflict in West Asia, which has caused serious economic disruption across the world and led to loss of life in many countries.
India hopes that the implementation of this understanding will…
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2026
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]