Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम बंगालमधल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना दु:ख, मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांचे साहाय्य मंजूर


पश्चिम बंगाल येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

“पश्चिम बंगालमधल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख वाटते. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांसाठी मी प्रार्थना करतो. ते लवकर बरे होवोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांचे तर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांचे साहाय्य मंजूर केले आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar