Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पाकिस्तानातून परतल्यानंतर गीताने पंतप्रधानांची भेट घेतली

काही वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेलेली भिन्नत: सक्षम (मूकबधीर) गीता हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आज सकाळी ती भारतात पोहोचली.

मायदेशी तुझे स्वागत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या स्वागताने भारावून गेलेल्या गीताने पंतप्रधानांची गळाभेट घेतली. तुझ्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि सर्व देशवासीय तुझी काळजी घेतील, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी गीताला दिले. तसेच कित्येक वर्ष गीताचा प्रेमाने सांभाळ केल्याबद्दल एदी फाऊंडेशनच्या संस्थापक बिल्किस बानो एदी यांचे कौतुक केले. गीताचा सांभाळ करण्यासाठीच नव्हे एदी फाऊंडेशन करत असलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संस्थेला एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिल्किस बानो एदी यांचा जन्म गुजरातमधील जुनागड येथील बन्तवा येथील असल्याचे कळल्यावर पंतप्रधानांनी त्यांना कुटुंबासह जुनागडला येण्याचे आमंत्रणही दिले.

याप्रसंगी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताचा प्रेमाने सांभाळ केल्याबद्दल श्रीमती बिल्किस आणि एदी फाऊंडेशनची प्रशंसा केली.

N.Chitale/S.Tupe/N.Sapre