पीएम्इंडिया
राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी, एनआयआयएफमधे दीर्घकालीन गुंतवणूकीला चालना देण्याच्या दृष्टीने भारत आणि युएई अर्थात संयुक्त अरब अमिरात यांच्यात 11 फेब्रुवारी 2016 ला झालेल्या सामंजस्य कराराला, केंद्रीय मंत्रिमंडळानं पूर्वलक्षी प्रभावानं मंजूरी दिली आहे.
वाणिज्यिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्पात पायाभूत विकास साधून वित्तीय घडामोडींना चालना देणं हे एनआयआयएफ चे उद्दीष्ट आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत दोन्ही बाजूंच्या संबंधित प्रतिनिधींचा समावेश असणारा संयुक्त कार्यकारी गट सहकार्य वाढवेल, तसंच शर्ती, निकष, तत्त्वे याबाबत चर्चा करुन मान्यता देईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑगस्ट 2015 च्या भेटीत भारत-युएई यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनात युएई-इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट फंडच्या स्थापनेचा उल्लेख आहे. भारतात पायाभूत गुंतवणूकीसाठी 75 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं उद्दीष्ट यासाठी ठेवण्यात आलं आहे.
N. Chitale / S.Tupe / M. Desai