Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुढील तीन वर्षांसाठी नियंत्रण, मतदान आणि व्हीव्हीपीएटी यंत्रे खरेदी करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

• 2016-17 दरम्यान, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून प्रति युनिट 77007 रुपये अंदाजे खर्चाची 5,50,000 मतदान यंत्रे आणि प्रति युनिट 9300 रुपये खर्चाची 5,45,000 नियंत्रण यंत्रे.

• यंत्रांच्या किंमतीत लक्षणीय घट व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधन आणि विकास प्रयत्नांसाठी 25 कोटी रुपये. 2017-18 आणि 2018-19 या वर्षांसाठी देखील नियंत्रण व मतदान यंत्रांची खरेदी करण्याचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 2016-17, 2017-18 आणि 2018-19 या वर्षांसाठी वोटर व्हेरिफायवल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्रे खरेदी करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.

• यामुळे 2000-2005 या कालावधीत खरेदी करण्यात आलेली कालबाहय ठरलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकून 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या गरजा पूर्ण होतील.

S.Kane/B.Gokhale