Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान स्थापनादिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाषण


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापनादिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण देणार आहेत. या संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सायंकाळी 5.00 वाजता पंतप्रधानांचे भाषण होणार आहे.

“पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी स्थापना दिनानिमित्त मी आज सायंकाळी 5.00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण करणार आहे”, असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha