Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या डबल स्कल्समध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सतनाम सिंग आणि सलमान खान यांचे अभिनंदन केले


नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुरुषांच्या डबल स्कल्समधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सतनाम सिंग आणि सलमान खान यांचे अभिनंदन केले, या दोघांनी उत्कृष्ट कामगिरी करुन भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

या दोघांचा संयम आणि समन्वय लक्षवेधी ठरल्याचे पंतप्रधान म्हणाले. या कामगिरीमुळे भविष्यात यशाची अधिक उंच शिखरे गाठण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

पुरुषांच्या डबल स्कल्समध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी शानदार कामगिरी करत भारताला मानाचे कांस्यपदक मिळवून दिले.

त्यांचा संयम आणि समन्वय विशेष उल्लेखनीय ठरला. या यशामुळे त्यांना आगामी काळात यशाची आणखी मोठी शिखरे गाठण्यासाठी प्रेरणा मिळो, हीच शुभेच्छा.— PM @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai