पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथे होणाऱ्या पर्यावरण आणि हवामान बदल विषयक वार्षिक सीओपी 21 परिषदेला उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवॉ ओलान्द यांच्या बरोबर पंतप्रधान संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची बैठक आयोजित करणार आहेत. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या “नाविन्य अभियानाला”देखील पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.
“सीओपी 21” परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मी पॅरिसला रवाना होत आहे. या परिषदतेत पर्यावरण आणि हवामान बदल विषयक सर्व महत्त्वपूर्ण मुद्दयांवर आम्ही चर्चा करु.
या परिषदेत भारतीय दालनाचे उद्घाटन करणार असून या दालनात निसर्ग आणि पर्यावरणासोबत असलेली भारताची सांगड आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठीच्या कटिबध्दतेचे दर्शन घडणार आहे.
ओलान्द आणि मी संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे आयोजन करणार आहोत. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या “नाविन्य अभियानाला” उपस्थित राहणार आहे” असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Leaving for Paris, where I will join @COP21. In the Summit, we will deliberate on crucial issues relating to environment & climate change.
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2015
At the @COP21 will inaugurate India Pavilion, showcasing India's harmony with nature, environment & commitment to mitigate climate change.
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2015
President @fhollande & I will jointly host a meeting of International Solar Alliance. Will also attend 'Mission Innovation' hosted by @POTUS
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2015