Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरिस कराराला मंजुरी देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


गांधी जयंतीला 2 ऑक्टोबर 2016 रोजी पॅरिस कराराला (हवामान बदलविषयक) मंजुरी द्यायला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

गेल्या वर्षी 12 डिसेंबर 2015 रोजी 185 राष्ट्रांनी पॅरिस कराराचा स्वीकार केला. भारताने 22 एप्रिल 2016 रोजी न्यूयॉर्क इथे या करारावर स्वाक्षरी केली. आतापर्यंत 191 देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे. एकूण जागतिक उत्सर्जनात 55 टक्के वाटा असलेले 55 देश जेव्हा या कराराला मंजुरी देतील, तेव्हा हा करार अंमलात येईल, अशी तरतूद या करारात आहे. आतापर्यंत 61 देशांनी या कराराला मंजुरी दिली असून जागतिक कार्बन उत्सर्जनात त्यांचा वाटा 47.79 टक्के आहे.

भारताच्या मंजुरीनंतर हे प्रमाण 51.89 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. पॅरिस करार अंमलात आणणारा भारत हा महत्त्वाचा देश ठरणार आहे.

N.Sapre/S. Kakade/P. Kor