Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरीस करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पॅरीस येथे डिसेंबर 2015 मधे झालेल्या 21व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज् मधे स्वीकारण्यात आलेल्या पॅरीस करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर 22 एप्रिल 2016 रोजी भारतातर्फे या करारावर स्वाक्षऱ्या करतील.

जागतिक हवामान सहकार्यासंदर्भातला हा करार हवामानातील बदलांसंदर्भात मैलाचा दगड मानला जात आहे. प्रत्येक देशातील सद्यस्थिती विचारात घेता, त्यानुसार संबंधित देशांच्या क्षमता आणि जबाबदाऱ्या निर्धारित करुन, हवामानातील बदलविषयक सहकार्य वृद्धिंगत करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.

विकसनशील देशांचा विकासाचा हक्क यात मान्य करण्यात आला आहे. विकसित देशांच्या नेतृत्वासह शाश्वत जीवनशैली आणि वापराच्या शाश्वत आकृतीबंधाचे महत्त्व, या करारांतर्गत मान्य करण्यात आले आहेत. पर्यावरणातील बदलांचे धोके सौम्य करण्यासाठी विकसित देशांना अर्थसहाय्याचे प्रमाण वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित देशांना योग्य तंत्रज्ञान आणि क्षमता उभारणी मोठे सहाय्य मिळू शकणार आहे. या पॅरीस करारामधे भारताने उपस्थित केलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे आणि अपेक्षा समाविष्ट
M.Pange / S. Tupe / M. Desai