पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पेरू बरोबर वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीबाबतच्या व्यापार करारासाठी चर्चा करायला मंजुरी दिली.
पेरू देशाबरोबर व्यापार करार करण्याबाबत शक्यतांची चाचपणी करण्यासाठी १५ जानेवारी २०१५ रोजी भारत आणि पेरू दरम्यान एक संयुक्त अभ्यास गट स्थापन करण्यात आला. उभय देशांनी २० ऑक्टोबर २०१६ रोजी संयुक्त अभ्यास गट अहवाल सादर केला आणि वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीबाबतच्या व्यापारासाठी चर्चा सुरु ठेवण्याबाबत सहमती दर्शवली.
B.Gokhale/S.Kane/Anagha