
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
माननीय पंतप्रधान महोदय,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांतील सहकारी,
नमस्कार!
पोलंडच्या पंतप्रधानांचे भारतात मनःपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे.
वर्ष 2024 मधील माझ्या पोलंड भेटीदरम्यान त्यांनी माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे अगत्याने स्वागत केले होते. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही आपल्यातील संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा दिला.
याच भक्कम पायावर, गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या भागीदारीने नवा वेग घेतला आहे. आणि आज पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आम्ही आपल्या धोरणात्मक भागीदारीला आणखी सशक्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मित्रांनो,
भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्री केवळ राजनैतिक संबंधांवर नव्हे तर मानवता आणि सहानुभूती यांच्या सामायिक वारशावर आधारलेली आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जामनगर आणि कोल्हापूरच्या राजघराण्यांनी पोलंडच्या हजारो मुलामुलींना आणि त्यांच्या कुटुंबांना भारतात आश्रय दिला होता. पोलंडमधील लोक आजही जाम साहेब महाराजांचे अत्यंत आदराने “दोब्री महाराजा” म्हणजेच “सज्जन महाराज” या नावाने स्मरण करतात.
वर्ष 2022मध्ये युक्रेनमधून आपल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्यात सहकार्य करून पोलंडने देखील माणुसकीची हीच भावना जपली. जाम साहेब युथ एक्स्चेंज कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलंडमधील तरुण भारतात येत आहेत आणि आपल्यातील ऐतिहासिक मैत्रीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत याचा मला आनंद वाटतो.
मित्रांनो,
आज जग अनिश्चितता आणि बदलाच्या कालखंडातून जात आहे. अशा काळात देखील भारत आणि पोलंड हे दोन्ही देश विकास, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या महत्त्वाच्या केंद्राच्या रुपात उदयाला येत आहेत.
गेल्या वर्षी पोलंडच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाने एक ट्रिलीयन डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. यासाठी मी पंतप्रधानांचे खूप खूप अभिनंदन करतो. तसेच, भारताने देखील गेल्या तिमाहीत 7.8% ची प्रभावी वाढ नोंदवली आहे.
आपल्या वाढत्या आर्थिक ताकदीमुळे, भारत-पोलंड भागीदारीसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराने या संधींना आणखी व्यापक स्वरूप दिले आहे. हा करार अंमलात आल्यामुळे भारतातून पोलंडला यंत्रसामग्री, रसायने, प्लास्टिक्स तसेच अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
त्यासोबतच, रेल्वे आणि मोबिलिटी, प्रगत उत्पादन, अन्न प्रक्रिया आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत आपण पोलंडकडून नवीन गुंतवणूक आकर्षित करू.
मला विशेष आनंद आहे की, पंतप्रधान एका मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळासह भारतात आले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, दोन्ही देशांच्या कंपन्या एकत्र येऊन जगासाठी विश्वासार्ह पुरवठा साखळ्या विकसित करतील, आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे आपले सामायिक ध्येयदेखील साकार करतील.
मित्रहो,
आज आपण संरक्षण, अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली आहे. या सर्व धोरणात्मक क्षेत्रांमध्ये आपण पोलंडच्या कंपन्यांना भारतासोबत सह विकास आणि सह उत्पादनाठी आमंत्रित करत आहोत.
अत्यावश्यक खनिजे आणि कोळशाच्या गॅसीफिकेशन या क्षेत्रातही, आपण पोलंडच्या तज्ञतेचा लाभ घेत नव्या भागीदारी विकसित करू.
माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात आमच्यामधील संबंध आधीपासूनच दृढ आहेत. अनेक भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या पोलंडमध्ये कार्यरत आहेत. या सहकार्याला अधिक पुढे नेत, आम्ही भारत पोलंड स्टार्टअप ब्रिज स्थापन करण्यावर सहमती दर्शवली आहे.
आम्ही दोन्ही देशांमधील युवा वर्गा दरम्यान तंत्रज्ञान हॅकाथॉनचे आयोजनही करू. या उपक्रमांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, वित्त तंत्रज्ञान आणि नव्याने उदयाला येत असलेल्या इतर तंत्रज्ञानामधील आमच्या सहकार्याला नवी गती मिळेल, आणि दोन्ही देशांमधील युवा वर्गासाठी नव्या संधी निर्माण होतील.
मित्रहो,
सांस्कृतिक आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संबंध ही आमच्यामधील संबंधांची सर्वात मोठी ताकद आहे. पोलंडमध्ये संस्कृत अध्ययन आणि इंडॉलॉजीची समृद्ध परंपरा आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे.
क्राकोव्ह शहरात आपण इंडियन स्टडीज चेअर स्थापन केले आहे. आज आम्ही संस्कृती आणि शिक्षण, आणि त्यासोबतच क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो,
आज आम्ही प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही सविस्तर चर्चा केली. भारत आणि पोलंड, दोन्ही देशांचा लोकशाही मूल्ये आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. आमची अशी धारणा आहे की, जागतिक प्रशासन विषयक संस्थांना अधिक सक्षम आणि प्रभावी बनवण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक आहेत,
युक्रेन असो वा पश्चिम आशिया, भारत शांततेच्या दिशेने केलेल्या प्रत्येक अर्थपूर्ण प्रयत्नांना पाठिंबा देत राहील.
महामहीम,
आपल्या सामायिक इतिहासावर मानवता आणि संवेदनेची गहरी छाप आहे. तसेच आपल्या सामायिक भविष्यात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान सहकार्याच्या अफाट शक्यता आहेत.
मला विश्वास आहे की, तुमच्या या भेटीमुळे भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा आणि नवी उंची मिळेल. पुन्हा एकदा, तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत आहे.
तुमचे खूप खूप धन्यवाद.
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Addressing the joint press meet with PM Donald Tusk of Poland. @donaldtusk https://t.co/qTjZznPvZ3
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2026
We also discussed ways to deepen India-Poland ties in technology, innovation and people-to-people exchanges. We have agreed to establish an India-Poland StartUp Bridge and organise technology hackathons for our youth. We will also expand cooperation in AI, cybersecurity, education, culture, sports and tourism.
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2026
Held excellent talks with Prime Minister Donald Tusk of Poland. We reviewed the progress in our Strategic Partnership and discussed ways to further strengthen cooperation in: Trade and investment. Defence and space. Nuclear energy. Critical minerals. We also exchanged views on regional and global issues. @donaldtusk
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2026
पोलैंड के प्रधानमंत्री जी का भारत में हार्दिक स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। 2024 में मेरी पोलैंड यात्रा के दौरान उन्होंने मेरा और मेरे डेलिगेशन का आत्मीय स्वागत किया था। उस यात्रा में हमने अपने संबंधों को Strategic Partnership का दर्जा दिया। इसी मजबूत आधार पर, पिछले दो वर्षों में हमारी साझेदारी ने नई गति पकड़ी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
भारत और पोलैंड की मित्रता केवल कूटनीतिक संबंधों पर नहीं, बल्कि मानवता और संवेदना की साझी विरासत पर आधारित है। द्वितीय विश्व युद्ध के दौरान जामनगर और कोल्हापुर के राजपरिवारों ने, पोलैंड के हजारों बच्चों और परिवारों को भारत में आश्रय दिया था: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
हमारी बढ़ती आर्थिक ताकत ने भारत-पोलैंड साझेदारी के लिए नए अवसर पैदा किए हैं। और भारत-यूरोपियन यूनियन Free Trade Agreement ने इन अवसरों को और व्यापक बनाया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
हमारी बढ़ती आर्थिक ताकत ने भारत-पोलैंड साझेदारी के लिए नए अवसर पैदा किए हैं। और भारत-यूरोपियन यूनियन Free Trade Agreement ने इन अवसरों को और व्यापक बनाया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
आज हमने defence, space और nuclear energy में संबंधों को प्रगाढ़ करने पर सहमति बनाई है। इन सभी strategic क्षेत्रों में हम पोलैंड की companies को भारत के साथ co-development और co-production करने के लिए आमंत्रित करते हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
Cultural और People-to-people ties हमारे संबंधों की सबसे बड़ी ताकत हैं। हमें बहुत खुशी है कि पोलैंड में संस्कृत अध्ययन और Indology की समृद्ध परंपरा है। क्राकोव शहर में हमने Indian Studies Chair की स्थापना की है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
भारत और पोलैंड, दोनों democratic values और rule of law में विश्वास रखते हैं। हमारा मानना है कि global governance institutions को अधिक सशक्त और प्रभावी बनाने के लिए reform आवश्यक है। यूक्रेन हो या पश्चिमी एशिया, भारत शांति की दिशा में किये गए हर सार्थक प्रयास का समर्थन करता रहेगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026