पीएम्इंडिया
सक्रिय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणीसाठीच्या “प्रगती” या बहुआयामी मंचाचे दहावे सत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाशी संबंधित, जनतेच्या तक्रारींचा पंतप्रधानांनी आढावा घेतला आणि या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे आदेश संबंधितांना दिले. महाराष्ट्र, मिझोरम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, चंदीगड, दिल्लीसह अनेक राज्यातल्या रस्ते, रेल्वे, कोळसा, उर्जा, नवीकरणीय उर्जा यासह पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
उत्तराखंडमधल्या चारधामच्या रस्तामार्गे दळणवळण सुधारणा प्रकल्पांचा आढावा घेताना हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
रेल्वे स्थानकांच्या सर्वंकष पुनर्विकास प्रकल्पांचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. प्रत्येक राज्यात किमान अशा एका पुनर्विकास प्रकल्पांसदर्भात मुख्य सचिवांनी कार्य करावे अशा सूचना त्यांनी केल्या. पुनर्विकास केलेली अशी रेल्वे स्थानके अनोखे स्थापत्य आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र ठरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या परिसर विकास योजना, सहकारी संस्था, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम, आयुध निर्माण कारखान्यात सौर उर्जा प्रकल्पांना जोडणाऱ्या ग्रिडच्या स्थापनेचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
काला आजार निर्मुलन कार्यक्रमाचा आढावा घेऊन या आजाराचे लवकरात लवकर निर्मुलन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. मिशन इंद्रधनुषवर दृष्टीक्षेप टाकत निर्धारित कालमर्यादेत सर्व बालकांचे लसीकरण होण्यासाठी संघटित आणि धडक कृती आराखड्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
N. Chitale / S. Tupe / M. Desai
Today's PRAGATI session was extensive. We discussed infra projects, Mission Indradhanush, upgradation of NIFT campuses & other issues.
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2016
Discussed comprehensive re-development of railway stations. We want to make our stations iconic structures & centres of economic activities.
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2016
Also called for expediting work on the Char-Dham road connectivity improvement project in Uttarakhand. https://t.co/Z18lG3benQ
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2016