Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रगती व्दारे पंतप्रधानांचा संवाद

प्रगती व्दारे पंतप्रधानांचा संवाद

प्रगती व्दारे पंतप्रधानांचा संवाद


प्रो-ॲक्टीव्ह गव्हर्नन्स ॲण्ड टाईमली इंम्लिमेंटेशन प्रगती अर्थात तत्पर शासन आणि वेळेवर अंमलबजावणी व्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आठवा वार्तालाप झाला.

महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ओदिशा, छत्तीसगड, तेलंगण सहित इतर राज्यातल्या रस्ते, रेल्वे, मेट्रो रेल्वे, ऊर्जा, अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.

हैद्राबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेताना, हा सार्वजनिक खाजगी भागिदारी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधानानी संबंधित अधिका-यांना दिले.

पूर्वीय मालवाहतूक कॉरिडॉर, दिल्ली, हरियाणा उत्तर प्रदेश परिघीय महामार्गासह आणखी काही महत्वाच्या प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.

फूड पार्क योजनेचा आढावा घेताना, याआधी पूर्ण झालेल्या पार्कच्या लाभाचे व्यापक मूल्यांकन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

म्यानमार मधल्या कालादन मल्टी मोडल वाहतूक तसेच रिह-तेदिम रस्ते प्रकल्पाचा आढावा घेतला. हा प्रकल्प म्हणजे पूर्वेकडे पहा या धोरणाची कोनशिला असून तो जलदगतीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. मनरेगा अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला.

N.Chitle/SMK/MD