पीएम्इंडिया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री कौशल विकास योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत 2016 ते 2020 या चार वर्षांच्या अवधीत देशभरातील 1 कोटी नागरिकांना कौशल्ये प्रदान केली जाणार आहेत. त्यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद आहे.
या योजनेअंतर्गत 60 लाख युवकांना नव्याने प्रशिक्षण दिले जाणार असून 40 लाख लोकांचे कौशल्य प्रमाणित केले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण आणि मूल्यांकनाचा थेट परतावा, प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या आणि मूल्यांकन करणाऱ्या संस्थांना प्राप्त होणार आहे.
M.Pange/B.Gokhale