Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


तप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

‘प्राध्यापक स्टीफन हॉकिंग हे असामान्य शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांच्या धैर्य आणि चिकाटीमुळे ते जगभरातल्या लोकांसाठी प्रेरणा बनले. त्यांचे निधन दु:खदायी आहे. प्राध्यापक हॉकिंग यांच्या आद्यप्रवर्तक कार्यामुळे आपले जग अधिक चांगले ठिकाण झाले आहे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

***

B.Gokhale/J. Patankar/P.Kor