पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 6 मे 2026
सामंजस्य करार/करार
|
1 |
आयआरईएल (इंडिया) लिमिटेड आणि व्हिएतनामच्या इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी ऑफ रेडिओॲक्टिव्ह अँड रेअर एलिमेंट्स (आयटीआरआरई) यांच्यात परस्पर सहकार्याबाबत सामंजस्य करार |
हा सामंजस्य करार दुर्मिळ खनिज घटक क्षेत्रासह इतर आधुनिक तंत्रज्ञानातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबत दीर्घकालीन द्विपक्षीय वचनबद्धतेला औपचारिक स्वरूप देतो. |
|
2 |
भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि व्हिएतनामचे सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालय यांच्यातील 2026-30 साठीचा सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम |
भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 1976 मध्ये सांस्कृतिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांतर्गत हाती घेतले जाणारे विशिष्ट उपक्रम आणि देवाणघेवाणीला, पाच वर्षांच्या (2026-2030) कालावधीसाठी वैध असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या (सीईपी) चौकटीत सहमती दर्शवण्यात आली. |
|
3 |
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम (एसबीव्ही) यांच्यात ‘पेमेंट प्रणाली‘ आणि ‘डिजिटल पेमेंट्समधील नवोन्मेष‘ या क्षेत्रांतील सहकार्याबाबतचा सामंजस्य करार. |
आर्थिक नवोन्मेष आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रात सहकार्यासाठी एक चौकट स्थापन करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. |
|
4 |
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि व्हिएतनामच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत व्हिएतनाम औषध प्रशासन‘ (डीएव्ही) यांच्यात वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रात सहकार्याबाबतचा सामंजस्य करार. |
औषधनिर्माण, जैविक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधने यासह वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी एक चौकट स्थापन करण्याचे उद्दिष्ट. |
|
5 |
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी पीपल्स कमिटी यांच्यात मैत्री आणि सहकार्य प्रस्थापित करण्याबाबतचा सामंजस्य करार. |
दोन्ही महानगरांना नागरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासामधील कौशल्य सामायिक करता यावे, यासाठी एक औपचारिक चौकट तयार करण्याचे उद्दिष्ट. |
|
6 |
आयसीसीआर आणि युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड एज्युकेशन, द दा नांग युनिव्हर्सिटी यांच्यात आयसीसीआर भारत अभ्यास अध्यासना’च्या स्थापनेबाबत सामंजस्य करार. |
या सामंजस्य कराराद्वारे व्हिएतनाममधील दा नांग विद्यापीठात आयसीसीआर अध्यासनाची स्थापना केली जाईल. |
|
7 |
नालंदा विद्यापीठ, राजगीर आणि हो ची मिन्ह नॅशनल अॅकॅडमी ऑफ पॉलिटिक्स (एचसीएमए), हनोई यांच्यात सामंजस्य करार. |
या करारामुळे व्हिएतनामला क्षमता विकास आणि प्रशिक्षण पुरवण्याबाबतच्या भारताच्या दीर्घकालीन उपक्रमांना बळकटी मिळेल. |
|
8 |
भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि व्हिएतनामचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार |
हा सामंजस्य करार डिजिटल तंत्रज्ञान आणि आयटी क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या द्विपक्षीय वचनबद्धतेला बळकटी देईल. |
अनु क्र. | शीर्षक | संक्षिप्त वर्णन |
|---|
|
9 |
एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (एनआयपीएल) आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ व्हिएतनाम (एनएपीएएस) यांच्यातील सामंजस्य करार |
हा सामंजस्य करार भारताच्या एनआयपीएल आणि व्हिएतनामच्या एनएपीएएस यांच्यात सीमापार क्यूआर कोड पेमेंट इंटरऑपरेटिबिलिटीसाठी संस्थात्मक संबंध प्रस्थापित करेल |
|
10 |
भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कार्यालय आणि व्हिएतनामचे राज्य लेखापरीक्षण कार्यालय यांच्यातील सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षणाच्या क्षेत्रातील सामंजस्य करार |
हा सामंजस्य करार भारत आणि व्हिएतनामच्या या लेखापरीक्षण संस्थांदरम्यान 2010 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण असून तो अधिक लवचिक गतिमान बनवण्यात आला आहे. |
|
11 |
भारताचे पर्यटन मंत्रालय तसेच व्हिएतनामचे क्रीडा, संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय यांच्यातील पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार. |
हा सामंजस्य करार दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रोत्साहन देतो. |
|
12 |
आयसीसीआर तसेच सामाजिक विज्ञान आणि मानव्यशास्त्र विद्यापीठ यांच्यात ‘आयसीसीआर भारतीय अभ्यास अध्यासन‘ स्थापन करण्यासंबंधी सामंजस्य करार |
या सामंजस्य करारानुसार सामाजिक विज्ञान आणि मानव्यशास्त्र विद्यापीठात एक ‘आयसीसीआर अध्यासन‘ स्थापन केले जाणार आहे.
|
|
13 |
ज्ञान भारतम, संस्कृती मंत्रालय तसेच सामाजिक विज्ञान आणि मानव्यशास्त्र विद्यापीठ, व्हिएतनाम राष्ट्रीय विद्यापीठ, हो चि मिन्ह सिटी (USSH, VNUHCM) यांच्यात चाम हस्तलिखितांच्या डिजिटायझेशनसंबंधी सामंजस्य करार |
या सामंजस्य करारानुसार, सध्या व्हिएतनाममध्ये जतन केलेल्या भारतीय मूळ असलेल्या चाम हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि ऑनलाइन प्रसार करण्यासाठी एनएमएम, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि युएसएसएच, व्हीएनयूएचसीएम यांच्यात संस्थात्मक सहकार्य प्रस्थापित केले जाणार आहे. |
घोषणा
|
क्र. |
शीर्षक |
|
1 |
द्विपक्षीय संबंधांना वर्धित व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देणे |
|
2 |
2030 पर्यंत 25 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे नवीन व्यापार उद्दिष्ट |
|
3 |
व्हिएतनामचा इंडो–पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह (आयपीओआय) मध्ये सहभाग |
|
4 |
भारतीय द्राक्षांची व्हिएतनामला आणि व्हिएतनामी डूरियन फळाची भारतात आयात करण्याची घोषणा |
|
5 |
युनेस्को जागतिक वारसा स्थळ माय सन येथे साईट इंटरप्रिटेशन सेंटर स्थापन करण्याची घोषणा |
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Addressing the joint press meet with President of Vietnam, Mr. To Lam.
— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2026
https://t.co/ILXwDMIxkl
हमारी साझा विरासत को जीवंत रखने के लिए, हम वियतनाम के प्राचीन चम्पा सभ्यता के मी सॉन और न्हान टवर मंदिरों का restoration कर रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) May 6, 2026
अब हम चम्पा सभ्यता की manuscripts को भी digitalize करेंगे,
और इस अमूल्य धरोहर को आने वाली पीढ़ियों के लिए संरक्षित करेंगे: PM @narendramodi
भारत और वियतनाम की साझेदारी में, विरासत और विकास- दोनों का महत्व है।
— PMO India (@PMOIndia) May 6, 2026
पिछले वर्ष, जब भारत से बौद्ध अवशेष वियतनाम गए,
तो उनके दर्शन, डेढ़ करोड़ से अधिक, यानि पूरे वियतनाम की population के 15% लोगों ने किया था: PM @narendramodi
हमारी drug authorities के बीच MOU से अब भारत की दवाइयों का वियतनाम में access बढ़ेगा।
— PMO India (@PMOIndia) May 6, 2026
भारत के agriculture, fisheries और animal products का भी,
वियतनाम तक export और सुगम होने जा रहा है: PM @narendramodi
Financial connectivity को भी boost करने के लिए, आज हमने अपने central banks के बीच सहयोग बढ़ाने का निर्णय किया है।
— PMO India (@PMOIndia) May 6, 2026
भारत के UPI और वियतनाम के फास्ट पेमेंट सिस्टम भी जल्द ही लिंक होने जा रहे हैं: PM @narendramodi
वियतनाम भारत की Act East Policy और विज़न महासागर का एक मुख्य स्तंभ है।
— PMO India (@PMOIndia) May 6, 2026
इंडो-पैसिफिक क्षेत्र में भी हमारा common outlook है।
हम अपनी सुदृढ़ होती हुई रक्षा और सुरक्षा सहयोग से, rule-of-law, शांति, स्थिरता और समृद्धि के प्रति योगदान देते रहेंगे।
वियतनाम के सहयोग से भारत, आसियान…
पहलगाम आतंकी हमले की कड़ी निंदा करने और आतंकवाद के विरुद्ध हमारे संघर्ष में साथ खड़े रहने के लिए हम वियतनाम के आभारी हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 6, 2026