पीएम्इंडिया
भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी, आपल्या सामायिक मूल्ये आणि परस्पर सन्मानावर आधारित असून दोन्ही देशांची सुरक्षा आणि समृद्धी पुढे नेण्यासाठी महत्वाची आहे. आर्थिक सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य हा आमचा धोरणात्मक दृष्टीकोन आणि आर्थिक अनिवार्यतेमधील वाढत्या अभिसरणातून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे.
दोन गतिशील लोकशाही आणि मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणून, भारत आणि जपान आपला राजकीय विश्वास, आर्थिक गतिशीलता आणि नैसर्गिक पूरकतेच्या आधारावर महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आपली भागीदारी वाढवण्याप्रति वचनबद्ध आहेत.
अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर)
महत्त्वपूर्ण खनिजे
माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान
स्वच्छ ऊर्जा
वैज्ञानिक सहकार्य
औषधनिर्मिती
आपली भागीदारी वाढवणे
जापान आणि भारत, बदलत्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या आपल्या सामायिक स्वारस्याची जाणीव ठेवून, आर्थिक सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास वचनबद्ध आहेत. हिंद – प्रशांत आणि त्यापलीकडे नियम-आधारित आर्थिक व्यवस्थेच्या आपल्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित राहून, दोन्ही देश सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करून धोरणात्मक क्षेत्रांमध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठी, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच विश्वासार्ह आणि पारदर्शक चौकटी प्रोत्साहित करण्यासाठी पुढे जात राहतील.
***
यश राणे / राजश्री आगाशे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]