Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फेब्रुवारी 2015 च्या “मन की बात” या रेडिओ कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी सूचना आणि अनुभव मागविले


आकाशवाणीवरुन या महिन्यात सादर होणाऱ्या “मन की बात” कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना आणि अनुभव मागवले आहेत.

बोर्डाच्या तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “मन की बात” व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात आल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

युवकांना स्फुर्तीदायी ठरतील तसेच परिक्षेची तयारी करताना त्यांना प्रोत्साहन देतील असे अनुभव विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी व्यक्त करावेत.

नेहमीप्रमाणे यातले काही विचार, अनुभवांचा या कार्यक्रमात समावेश होईल. http://mygov.in/groupissue/inputs-for-mann-ki-baat-february-2015/show”, येथे आपले अनुभव व्यक्त करावेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.