Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली


फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सार्कोझी यांच्या ‘ला फ्रान्स पोर ला व्ही’ या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल आणि त्याला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधानांनी सार्कोझी यांचे अभिनंदन केले.

पॅरीस, पठाणकोट, ब्रसेल्स आणि जगाच्या इतर भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदी आणि सार्कोझी यांनी निषेध केला आणि दहशतवादाच्या धोक्याविरुद्ध जागतिक समुदायाने ठोस पावले उचलावी, असे आवाहन केले.

पॅरीसमध्ये गेल्या वर्षी झालेल्या COP-21 परिषदेच्या यशस्वीतेसाठी भारताने बजावलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल सार्कोझी यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले.

J. Patankar / B. Gokhale