Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बरेलीमधील बस अपघातात दगावलेल्यांबद्दल पंतप्रधानांना शोक


उत्तर प्रदेशातील बरेलीमधील बस अपघातात दगावलेल्यांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“उत्तर प्रदेशात बरेली येथे झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. दगावलेल्यांप्रति मी तीव्र शोक व्यक्त करतो आणि या अपघातात जखमी झालेले लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

या दुर्घटनेत दगावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीररित्या जखमी झालेल्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha

भारत सरकार