पीएम्इंडिया
बांग्लादेशचे पंतप्रधान, भूतानचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान, म्यानमारचे राष्ट्रीय सल्लगार, नेपाळचे पंतप्रधान, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि थायलंडच्या पंतप्रधानाचे विशेष दूत असे आम्ही सर्वजण १६ ऑक्टोबर २०१६ रोजी गोवा इथे ब्रिक्स-बिमस्टेक शिखर परिषदेसाठी एकत्रित भेटलो.
थायलंडचे महाराज भुमिबोल अद्युल्यादेज यांच्या निधनाबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांना पहिला मानवी विकास जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून जागतिक विकासातील त्यांच्या योगदानाला पोचपावतीच प्रदान केली होती. शाही कुटुंब, थायलंडचे सरकार आणि तिथल्या नागरिकांप्रती आम्ही खेद व्यक्त करतो.
ब्रिक्स आणि बिमस्टेक नेत्यांदरम्यान परस्पर हिताच्या मुद्द्यांवर आणि शाश्वत विकासाकरिता संयुक्त राष्ट्राच्या २०३० विषयसूचीसह महत्वपूर्ण जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर या परिषदेत मते मांडण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा करतो. आम्हाला आशा आहे की,या संयुक्त परिषदेमुळे परस्परातील विश्वास अधिक दृढ होईल आणि दोन्ही समूहातील देशांमध्ये मतैक्य वृद्धिंगत होईल आणि यामुळे परस्पर हिताच्या बाबींमध्ये सहकार्य वाढायला प्रोत्साहन मिळेल.
१९९७ च्या बँकॉक घोषणापत्रातील तत्वांचे स्मरण करताना आम्ही पुन्हा जोर देतो की, बिमस्टेक मधील परस्पर सहकार्य हे सार्वभौम समानता, प्रादेशिक अखंडता, राजकीय स्वातंत्र्य, आंतर व्यवहारात हस्तक्षेप न करणे, शांतता आणि परस्पर हिताच्या तत्वांवर आधारित आहे.
१९९७ च्या बँकॉक घोषणापत्रातील आराखड्यानुसार बिमस्टेकचा उद्दिष्ट आणि हेतू लक्षात घेण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू यावर आमचे एकमत झाले आहे आणि निवडक प्राधान्यक्रम क्षेत्रात परस्पर लाभकारक सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक विकास करण्याची क्षमता बिमस्टेक मध्ये आहे याची आम्हाला खात्री आहे. बिमस्टेकला मजबूत, अधिक कार्यक्षम आणि निर्णयाभिमुख बनवण्यासाठी एकत्रित कार्य करण्याची आम्ही शपथ घेतो.
४ मार्च २०१४ रोजी नाय पई ताव इथे तिसऱ्या बिमस्टेक परिषदेचे जे घोषणापत्र जारी करण्यात आले होते त्याचे आम्ही स्मरण करतो आणि बंगालच्या उपसागरातील प्रदेशात ऐक्य आणि प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देणारी संघटना म्हणून बिमस्टेकच्या सखोल वचनबध्तेचा आम्ही पुनरुच्चार करू इच्छितो. आपली भौगोलिक परिस्थिती, मुबलक नैसर्गिक आणि मानवीय स्रोत, समृध्द ऐतिहासिक संबंध आणि सांस्कृतिक वारसा बिमस्टेकला आपल्या प्रदेशात शांती, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ प्रदान करेल हे आम्ही ओळखले आहे.
आपल्या प्रदेशात शांती आणि स्थैर्याला सर्वात मोठा धोका हा केवळ दहशतवादामुळे असल्याचे लक्षात आल्यानंतर, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि जगभरात होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही यावर आम्ही जोर देतो. देशात नुकत्याच झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्याचे आम्ही तीव्र शब्दात विरोध करतो. आमचा ठाम विश्वास आहे की, दहशतवादाविरुद्धचा आमचा लढा केवळ दहशतवाद, दहशतवादी संघटना त्यांच्या जाळ्याचे समूळ उच्चाटन करणे एवढ्यापुरतेच सीमितनसून दहशतवादी आणि दहशतवादी गटांचे समर्थन आणि आर्थिक सहाय्य करणाऱ्या, त्यांची जमीन दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करून देणारे देश शोधून त्यांना त्यासाठी जबाबदार ठरविणे याचा देखील यात समावेश आहे. यापुढे दहशतवाद्यांचे हुतात्मा म्हणून उदात्तीकरण केले जाणार नाही. दहशतवाद, हिंसक उग्रवाद आणि परिवर्तनवादाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमच्या ध्यानात आले आहे. आमच्या कायदा अंमलबजावणी, गुप्तचर आणि सुरक्षा संघटनान दरम्यान सहकार्य आणि समन्वय स्थापित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
हवामान बदलाचा आपली पृथ्वी आणि विशेषतः बंगालच्या उपसागरातील प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवाला आणि त्यांच्या उपजीविकेला असणाऱ्या वाढत्या धोक्याची आम्हाला जाणीव आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही सहकार्य वृद्धिंगत करण्याचे ठरविले आहे. शाश्वत विकास व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर हवामान बदलावरील पैरीस कराराच्या अंमलबजावणीच्या आवशक्यतेवर आम्ही जोर देतो.
संयुक्त सराव, पूर्व सूचना प्रणालीसह माहितीची देवाण घेवाण, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब, मदत व पुनर्वसनासाठी एकत्रित कार्य आणि क्षमता वृद्धिंगत या सर्व माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनामध्ये अधिक सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो.
प्रादेशिक एकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध मार्गांनी आंतर विभाग संलग्नतेचा विकास केला पाहिजे ही बाब आम्हाला पटली असून, बिमस्टेक क्षेत्रात आधुनिक बहु – आयामी भौतिक जोडणी उपक्रम राबविण्याचे निरंतर प्रयत्न करत असल्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. बिमस्टेक वाहतूक पायाभूत सुविधा आणि वाहतुकी संदर्भातल्या अभ्यासाच्या शिफारशींच्या अंमलबजावणी मधील प्रगती पाहून आम्ही समाधान व्यक्त करतो. बिमस्टेक वाहन करार लागू करण्यावर आम्ही संमती दर्शवली आहे.
आम्ही शाश्वत कृषी आणि अन्न सुरक्षे संदर्भातल्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. पीक, पशुधन आणि फलोत्पादनासह कृषी क्षेत्रामधील सहकार्य करण्यासाठी आम्ही संमती दर्शवली आहे, तसेच प्रदेशात कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी सहकारात्मक प्रयत्न वाढविण्याचे देखील आम्ही ठरविले आहे.
जगातील एकूण मच्छिमारांच्या ३० टक्के मच्छिमार हे बंगालच्या उपसागराच्या प्रदेशात याची आम्हाला जाणीव आहे, आम्हाला हे ध्यानात आले आहे की, या प्रदेशामधील मच्छिमारीच्या शाश्वत विकासातील सहकार्यामध्ये लोकांचे जीवनमान सुधारणे आणि अन्न सुरक्षेच्या दिशेने लक्षणीय योगदान करण्याची क्षमता आहे आणि या क्षेत्रामधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही मंजुरी दर्शवली आहे.
आमच्या प्रदेशात समाविष्टीत असलेल्या नील अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये प्रचंड क्षमता असल्याचे आम्ही ओळखले आहे, आपल्या प्रदेशाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टासह सागरीसंस्कृती (अंतर्देशीय आणि सागरी), हायड्रोग्राफी, समुद्रातील खनिज संपत्ती शोधणे, सागरी नौकायन, निसर्ग – पर्यटन आणि नवीकरणीय सागरी उर्जेसारख्या क्षेत्रात सहकार्य अधिक सखोल करण्याचे विविध मार्ग शोधण्यावर आम्ही संमती दर्शवली आहे.
डोंगराळ प्रदेशापासून मिळणारे फायदे हे शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे हे आम्ही मंजूर केले आहे. जैव विविधतेसह डोंगर पर्यावरण प्रणालीच्या संवर्धनाच्या दिशेने अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आम्ही आवाहन केले आहे.
बिमस्टेक सदस्य देशांदरम्यान उर्जा क्षेत्रातील वाढत्या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो. ग्रीड आंतरजोडणीवरील बिमस्टेक सामंजस्य कराराला तडीस नेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. बिमस्टेक उर्जा केंद्राच्या लवकरात लवकर कार्यन्वित होण्याच्या दिशेने आम्ही पावले उचलत आहोत. उर्जा सहकार्यासाठी सर्वसमावेशक योजनेचा विकास करून ती कार्यान्वित करण्यासाठी आम्ही मंजुरी दर्शवली आहे.
बिमस्टेक मुक्त व्यापार क्षेत्र वाटाघाटीच्या याआधीच्या निष्कार्षाच्या आमच्या वचनबद्धतांचे आम्ही नुतनीकरण केले आहे आणि या घटक कराराला पूर्णत्वास नेण्याचे निर्देश व्यापार वाटाघाटी समिती आणि कार्य समूहाला दिले आहेत. सेवा आणि गुंतवणुकीवरील करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याचे निर्देश व्यापार वाटाघाटी समितीला आम्ही दिले आहेत. व्यापार सुलभीकरण वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर आम्ही संमंती दर्शविली आहे. किमान विकसित देशांसाठी विशेष आणि विविध उपाययोजना पुरवण्याकरिता देखील आम्ही संमंती दर्शवली आहे.
लघु मध्यम उद्योगांसह तंत्रज्ञानाच्या विकास, प्रवेश आणि उपलब्धतेची आवशक्यता लक्षात घेऊन संपूर्ण क्षेत्रात सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, श्रीलंकेतील बिमस्टेक तंत्रज्ञान हस्तांतरण सुविधेच्या स्थापनेसाठी संघटनेच्या मसुद्याला त्वरित अंतिम स्वरूप देण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य समस्यांना सामोरे जाण्यासाठी आम्ही सतत एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत यावर आम्ही मंजुरी दर्शवली आहे.पारंपारिक औषधांमधील समन्वयासाठी राष्ट्रीय केंद्रांचे जाळे निर्माण करण्याचे आणि या क्षेत्राचा विस्तार आणि सखोल सहकार्यासाठी कृती दल स्थापन करण्याचे निर्देश आम्ही बिमस्टेकला दिले आहेत.
सदस्य देशांमध्ये विविध पातळ्यांवर लोकांमधील परस्पर संवादाला प्रोत्साहित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि प्रदेशामध्ये सखोल सामंजस्य आणि विश्वास निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बी एन पी टी टी च्या २ बैठका झाल्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो आणि सदस्य देशाच्या लाभधारकांसोबत नेहमी सल्लामसलत करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी बिमस्टेकला प्रोत्साहन देण्यात येते. आमच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये संलग्नता विस्तारित करण्यासाठी आम्ही संमती दर्शवली आहे.
आपल्या प्रदेशमध्ये नागरीकरण, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सहलग्नता स्वीकारून, आम्ही पर्यटनाच्या विकासासाठी आवश्यक समृद्ध क्षमता ओळखल्या आहेत. विशेष पर्यटन सर्किट आणि निसर्ग पर्यटनासह आंतर- बिमस्टेक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलण्यामध्ये आम्हाला रुची आहे. प्रदेशामध्ये विशेषतः बुद्धीस्ट पर्यटन सर्किट आणि मंदिर पर्यटन सर्किटच्या विकासाला आम्ही प्रोत्साहन देत आहोत.
भूतानमध्ये बिमस्टेक सांस्कृतिक उद्योग आयोग आणि बिमस्टेक सांस्कृतिक उद्योग वेधशाळा स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, जी सांस्कृतिक उद्योगावरील माहितीचे भांडार असेल.
जानेवारी २०१२ मध्ये नेपाळ मध्ये दारिद्रय निर्मुलानावर झालेल्या दुसऱ्या बिमस्टेक मंत्रीस्तरीय बैठकीमध्ये स्वीकारलेल्या आणि मार्च २०१४ मध्ये म्यानमार इथे झालेल्या तिसऱ्या बिमस्टेक परिषदेमध्ये स्वीकारलेल्या बिमस्टेक गरिबी कृती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्ही वचनबद्ध असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो.
बिमस्टेकचे कायमस्वरूपी सचिवालय सप्टेंबर २०१२ पासून ढाका इथे कार्यान्वित झाल्याबद्दल आम्हाला समाधान आहे तसेच हे सचिवालय कार्यान्वित करण्यासाठी बांगलादेशच्या सरकारने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा करतो.
वर्ष २०१७ मध्ये बिमस्टेकच्या स्थापनेला २० वर्ष पूर्ण होतील हे औचित्य साधून बिमस्टेकच्या सर्व सचिवालयांना उपक्रमांच्या श्रुंखलांचे आयोजन करण्यास सांगितले आहे.
ब्रिक्स-बिमस्टेक परिषदेमध्ये बिमस्टेक नेत्यांना आमंत्रित केल्याबद्दल आणि परिषदे दरम्यान उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आदरातिथ्या बद्दल आम्ही बांग्लादेश, भूतान, म्यानमार, नेपाल, श्रीलंका आणि थायलंडचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.
वर्ष २०१७ मध्ये नेपाळ इथे होणाऱ्या चौथ्या बिमस्टेक परिषदेची आम्ही वाट बघत आहोत.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha