पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत “बीएसएनएल” च्या निवृत्तीवेतन धारकांच्या आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या निवृत्तीवेतनातील विसंगती दूर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. “बीएसएनएल” मधून 10 जून 2013 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील 118500 सेवानिवृत्त वेतन धारकांना होणार असून त्यांना सुधारित श्रेणीनुसार निवृत्तीवेतन मिळणार आहे.
S.Bedekar/B.Gokhale