Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून शपथ घेणाऱ्या हाग्रामा मोहिलरी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 5 ऑक्‍टोबर 2025

हाग्रामा मोहिलरी यांनी बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हाग्रामा मोहिलरी यांचे बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. मोदींनी केंद्र सरकार आणि आसाम सरकार दोघांचेही बोडोलँड प्रादेशिक परिषद प्रशासनाला अढळ समर्थन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आणि आदरणीय बोडोफा उपेंद्रनाथ ब्रम्ह यांच्या  दृष्टीकोनाप्रती सामाईक वचनबद्धतेवर भर दिला.

एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात मोदी लिहितातः

“हाग्रामा मोहिलरी यांनी बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. त्यांना आणि त्यांच्या चमूला त्यांच्या कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा. महान बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्म यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करताना केंद्र सरकार आणि आसाम सरकार कायमच बोडोलँड प्रादेशिक परिषद सरकारला पाठिंबा देत राहील.

@HagramaOnline”

* * *

निलिमा चितळे/विजयालक्ष्‍मी साळवी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai