पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मंदियल दू केजो दू ब्राझील’ या चीज आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठीच्या रंगतदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय चीज उत्पादकांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत भारतातील चार उत्पादनांनी एक सुपर गोल्ड, दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी पदके पटकाविली.
“सुपर गोल्ड हे ‘एलेफ्थेरिया गुलमर्ग (ब्रि स्टाइल)’ याला मिळाले, सुवर्ण पदके ‘याक चुरपी–सॉफ्ट, नॉर्डिक फार्म, लेह, लडाख’ आणि ‘एलेफ्थेरिया ब्रुनोस्ट (वे चीज)’ यांनी जिंकली; तर रौप्य पदक ‘एलेफ्थेरिया काली मिरी (बेल्पर क्नॉले स्टाइल)’ याला मिळाले,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी मौसम नरांग आणि थेनले नुरबू यांच्यासह पुरस्कार विजेत्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अशा यशामुळे भारताच्या पारंपरिक दुग्धव्यवसायाची जागतिक स्तरावर ओळख वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे,
“भारतीय चीजचा जागतिक स्तरावर ठसा…
चीज आणि दुग्धजन्य उत्पादनांची रंगतदार आंतरराष्ट्रीय स्पर्धा, मंदियल दू केजो दू ब्राझील 2026 मध्ये भारताने प्रभावशाली पदार्पण केले आहे. चार भारतीय उत्पादनांनी पदके पटकाविली असून त्यात एक सुपर गोल्ड, दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाचा समावेश आहे.
सुपर गोल्ड हे ‘एलेफ्थेरिया गुलमर्ग (ब्रि स्टाइल)’ याला मिळाले, सुवर्ण पदके ‘याक चुरपी–सॉफ्ट, नॉर्डिक फार्म, लेह, लडाख’ आणि ‘एलेफ्थेरिया ब्रुनोस्ट (व्हे चीज)’ यांनी जिंकली; तर रौप्य पदक ‘एलेफ्थेरिया काली मिरी (बेल्पर क्नॉले स्टाइल)’ याला मिळाले. मौसम नारंग आणि थेनले नुरबू यांचे अभिनंदन.
अशा यशामुळे भारताच्या पारंपरिक दुग्धव्यवसायाची जागतिक मंचावरील ओळख दृढ होते.”
Cheese from India makes its mark globally…
India made an impressive debut at the Mundial do Queijo do Brasil 2026, which is a vibrant international competition for cheese and dairy products. Four Indian products won medals, including 1 Super Gold, 2 Golds and 1 Silver.
The…
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026
* * *
सुषमा काणे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Cheese from India makes its mark globally…
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026
India made an impressive debut at the Mundial do Queijo do Brasil 2026, which is a vibrant international competition for cheese and dairy products. Four Indian products won medals, including 1 Super Gold, 2 Golds and 1 Silver.
The…