पीएम्इंडिया
ब्रिक्स कृषी संशोधन मंच उभारण्यासाठी भारत आणि विभिन्न ब्रिक्स राष्ट्रात झालेल्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली.
पूर्वपीठिका:
रशियामधल्या उफा इथे 9 जुलै 2015 मध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,संपूर्ण जगाला भेट ठरणारा, ब्रिक्स कृषी संशोधन मंच उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. हे केंद्र, ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना,अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी, कृषी क्षेत्रात धोरणात्मक सहकार्याद्वारे,शाश्वत कृषी विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाला प्रोत्साहन देईल.
कृषी संशोधन धोरण,विज्ञान तंत्रज्ञान,शोध आणि नाविन्यता,क्षमता वृद्धी यामध्ये ब्रिक्स राष्ट्रातले सहकार्य आणखी दृढ करण्याच्या हेतूने, गोव्यात 16 ऑक्टोबर 2016 मध्ये झालेल्या आठव्या ब्रिक्स शिखर परिषदेत, कृषी संशोधन मंच स्थापन करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
जगभरात, उपासमार,पोषण मूल्ये कमतरता,दारिद्र्य आणि असमानता,,प्रामुख्याने शेतकरी आणि बिगर शेतकऱ्यांशी जोडल्या गेलेल्या उत्त्पन्नविषयक समस्यांच्या निराकरणासाठी तसेच कृषी व्यापार, जैव सुरक्षा आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिक्स कृषी संशोधन मंच काम करणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha