Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स देशांदरम्यान ऊर्जा बचत आणि ऊर्जा क्षमतेसंदर्भात सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, भारत आणि ब्रिक्स देशांदरम्यानच्या ऊर्जा बचत आणि ऊर्जा क्षमता सहकार्याला बळकटी आणि भविष्यात त्याचा विकास करण्यासंदर्भातल्या सामंजस्य कराराला आज मान्यता देण्यात आली. हा सामंजस्य करार समानता आणि द्विपक्षीय हिताच्या मूल्यांवर आधारित आहे.

ऊर्जा बचत आणि ऊर्जा क्षमता सहकार्यामधील खालील क्षेत्रांचा सामंजस्य करारामध्ये समावेश करण्यात आला आहे.

• संयुक्त वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन

• परिषद आणि व्याख्यानांचे आयोजन

• क्षमता वृध्दी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण

• तंत्रज्ञान विकास, चांगले उपक्रम आणि योजनांचे आदान प्रदान

• ऊर्जा क्षमता आणि ऊर्जा बचत दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai