Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स नेटवर्क युनिर्व्हसिटीत भारताच्या सहभागाला मंत्रिमंडळ मंजूरी


ब्रिक्स नेटवर्क युनिर्व्हसिटीबाबत ब्रिक्स राष्ट्रातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पूर्वलक्षी प्रभावाने संमती दिली.

या करारासंदर्भात ब्रिक्स राष्ट्रांच्या शिक्षणमंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीत तसेच रशियात मॉस्को येथे नोव्हेंबर 2015 मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती.

ब्रिक्स राष्ट्रात विज्ञान संशोधन वृध्दी, उच्च शिक्षण, माहिती देवाण-घेवाण, उत्तम प्रथांची अंमलबजावणी, संयुक्त संशोधन कार्यक्रम, विद्यार्थी संशोधक, शिक्षणतज्ञ यांचा ब्रिक्स राष्ट्रात सुलभ संचार यादृष्टीने सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे.

N.Chitale/M.Desai