Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भटिंडा येथे नवे एम्स उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंजाबमधल्या भटिंडा येथे नवे एआयआयएमएस अर्थात एम्स उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पीएमएसएसवाय) अंतर्गत हे एम्स उघडण्यात येणार आहे. 750 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात आपात्कालीन सेवा, आयुष, आयसीयू, सुपरस्पेशालिटी बेडस्‌ उपलब्ध असतील.

या एम्सच्या उभारणीसाठी 925 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या रोग आणि आरोग्याच्या इतर समस्यांवर या संस्थेमध्ये संशोधन अपेक्षित असून त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांचा शोधही घेतला जाईल. केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर चार वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या एम्समुळे पंजाब आणि लगतच्या राज्यांतल्या जनतेला फायदा होणार आहे.

MD/ST/NC/AK