Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या 11 वर्षांतील परिवर्तनशील प्रवासाला अधोरेखित करणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 18 जून 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या गेल्या 11 वर्षांतील परिवर्तनशील प्रवासाला अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण लेख आज त्यांच्या सामाजिक माध्यमांवरील पोस्ट मध्ये सामायिक केला. या लेखामध्ये भारताच्या अंतराळ क्षेत्राने पारंपरिक मर्यादांमधून बाहेर पडून लोकाभिमुख नवकल्पनांकडे केलेल्या प्रवासाचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे. भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानाचा लाभ आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत तसेच विविध विकासात्मक क्षेत्रांमध्येही याचा उपयोग होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या एक्स वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले की,

“केंद्रीय मंत्री @DrJitendraSingh यांनी  गेल्या 11 वर्षांत भारताच्या अंतराळ कार्यक्रमात झालेला बदल प्रभावीपणे मांडला आहे. हा बदल धाडसी, सर्वसमावेशक आणि  लोकाभिमुख असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपासून ते शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात भारताचे अंतराळ तंत्रज्ञान आता महत्त्वपूर्ण ठरत आहे.”

S.Bedekar/R.Dalekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai