नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि माईक ब्लूमबर्ग यांनी लिहिलेला, भारताचे स्वच्छ ऊर्जा संक्रमण वेगाने पुढे जात असून देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात सौरऊर्जेची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची ठरत असल्याविषयीचा लेख प्रसारित केला.
या लेखात नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर, छतांवरच्या सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार, तसेच ऊर्जा साठवणूक आणि वीज पारेषण क्षेत्रातील गुंतवणूक यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या बदलामुळे वीजबिलांचा भार कमी व्हायला, रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला आणि ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत व्हायला कशी मदत होत आहे, हेही या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे:
“भारताचे स्वच्छ ऊर्जा संक्रमण वेगाने पुढे जात आहे. देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात सौरऊर्जेची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची ठरत आहे.
@MikeBloomberg आणि केंद्रीय मंत्री @JoshiPralhad यांनी नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर, छतांवरील सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार, तसेच ऊर्जा साठवणूक आणि वीज पारेषण क्षेत्रातील गुंतवणूक यांविषयी लिहिले आहे.
या बदलामुळे वीजबिले कमी व्हायला, रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला आणि ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत व्हायला कशी मदत होत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले आहे.”
India’s clean energy transition is gathering pace, with solar power playing a growing role in meeting the country’s energy needs.
@MikeBloomberg and Union Minister Shri @JoshiPralhad write about the growth of renewable energy, the expansion of rooftop solar and investments in storage and transmission.
They highlight how this shift is helping reduce electricity bills, create jobs and strengthen energy security.
— PMO India (@PMOIndia) November 2, 2026
नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
India's clean energy transition is gathering pace, with solar power playing a growing role in meeting the country's energy needs. @MikeBloomberg and Union Minister Shri @JoshiPralhad write about the growth of renewable energy, the expansion of rooftop solar and investments in storage and transmission. They highlight how this shift is helping reduce electricity bills, create jobs and strengthen energy security.
— PMO India (@PMOIndia) November 2, 2026