Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे दक्षिण आशियाई प्रादेशिक प्रशिक्षण आणि तंत्रसहाय्य केंद्र स्थापन करायला मंजूरी


भारतात दक्षिण आशियाई प्रादेशिक प्रशिक्षण आणि तंत्रसहाय्य केंद्र स्थापन करण्याबाबत भारत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यातील करारावर स्वाक्षऱ्या करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.

यात भारतासह बांग्लादेश, भुतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या सदस्य देशांचा समावेश असून, सदस्यांच्या क्षमता विकासाच्या गरजा ओळखून त्‍यानुसार, आवश्यकतेनुसार सहाय्य केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सुक्ष्म, आर्थिक तसेच मौद्रिक धोरणांनुसार राज्य स्तरासह सर्वच शासकीय अधिकाऱ्यांमधे क्षमता विकसित करण्याच्यादृष्टीने हा करार सहाय्यक ठरणार आहे. तसेच त्यामुळे दक्षिण आशियातील सहा सदस्य देशांमध्ये समन्वयही वाढणार आहे.

माहिती तंत्रज्ञान आणि प्रगत तंत्रांचा वापर करुन आर्थिक, मौद्रिक आणि वित्तीय समस्या सोडवण्याच्या कामीही हा करार सहाय्यक ठरणार आहे.

नवी दिल्लीत आयोजित “ॲडव्हान्सिंग एशिया : इन्वेस्टींग फॉर दी फ्यूचर” या विषयावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रादेशिक परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या होणे अपेक्षित आहे.

M. Pange / S.Tupe / M. Desai