Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतात जर्मन ही अतिरिक्त परदेशी भाषा म्हणून आणि जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि जर्मनीच्या संघीय परदेशी कार्यालयादरम्यान संयुक्त आशय घोषणा पत्रावर स्वाक्षऱ्या करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतातील राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरुन केंद्रीय विद्यालयात जर्मन भाषेला अतिरिक्त परदेशी भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि जर्मनीच्या संघीय परराष्ट्र कार्यालयादरम्यान संयुक्त आशय घोषणा पत्रावर स्वाक्षऱ्या करण्याला मंजुरी देण्यात आली.

या संयुक्त आशय घोषणा पत्रामुळे भारत आणि जर्मनीदरम्यानच्या सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन मिळेल आणि हा करार दोन्ही देशातील कायदे, धोरणे आणि नियमांच्या अनुसार शिक्षण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठीही सहाय्यकारी ठरेल.

J. Patankar/S.Tupe/N.Sapre