Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतात साजऱ्या होणाऱ्या विविध सणांबाबत पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैसाखी, वैसाखदी, मसादी, बोहाग बिहू, पोईला बौशाखी, विशू, महा विशुबा संक्रांती आणि पुथंडू या देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या सणांबाबत लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या सर्व सणांमुळे आपल्या आयुष्यात आनंद आणि भरभराट होवो, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

‘येणारे वर्ष लोकांच्या विशेषत: तरुणांच्या आकाक्षांना पंख देणारे आणि सर्वांमध्ये सुसंवाद आणि आनंद पसरवणारे ठरो’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J. Patankar / B. Gokhale