पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेमबाज इलावेनिल वलारिवन यांचा एक लेख सामायिक केला. या लेखात, संपूर्ण भारतात खेळाडूंना मिळणाऱ्या पाठिंब्याच्या पद्धतीत झालेला महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित करण्यात आला आहे.
‘खेल महाकुंभ’ आणि ‘खेलो इंडिया’ सारख्या उपक्रमांद्वारे युवा प्रतिभेला वाव देण्यापासून ते खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वोच्च स्तरांवरील स्पर्धांसाठी सर्वसमावेशक सहाय्य देण्यापर्यंत पंतप्रधानांनी किती मोठ्या प्रमाणावर आणि मोलाचे सहकार्य केले आहे याकडे वलारीवन यांनी लक्ष वेधले आहे.
‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात :
“एलावेनिल वलारिवन लिहितात, भारतीय क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना मिळणाऱ्या पाठिंब्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. ‘खेल महाकुंभ’ आणि ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून युवा प्रतिभांना प्रोत्साहन देण्यापासून ते खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, सुविधा आणि सहाय्य उपलब्ध करून देण्यापर्यंत पंतप्रधान @narendramodi यांनी कशा प्रकारे पाठिंबा दिला आहे, यावर त्या प्रकाश टाकतात.
अवश्य वाचायला हवे असे पुस्तक !”
Indian sport has seen a significant shift in the way athletes are supported, writes Elavenil Valarivan. She reflects on how PM @narendramodi’s support has extended from encouraging young talent through Khel Mahakumbh and Khelo India to providing athletes with training, facilities and support at the highest level.
A must-read!
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026
सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Indian sport has seen a significant shift in the way athletes are supported, writes Elavenil Valarivan. She reflects on how PM @narendramodi's support has extended from encouraging young talent through Khel Mahakumbh and Khelo India to providing athletes with training, facilities and support at the highest level. A must-read!
— PMO India (@PMOIndia) October 7, 2026