पीएम्इंडिया
भारतीय भूमीवरील दहशतवादी/सांप्रदायिक/डावे अतिरेकी हल्ले/सीमेपलिकडील गोळीबार आणि खाणी/आईडी स्फोटांमधील बाधितांच्या सहाय्यासाठीच्या केंद्रीय योजनेअंतर्गंत दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम तीन लाखांवरुन पाच लाख रुपये करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.
या योजनेनुसार दहशतवाद डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये दगावलेल्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या धर्तीवर भारत-पाक सीमेवर सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबारात दगावलेल्यांच्या कुटुंबियांनाही पाच लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. यापुढे देशात कुठेही दहशतवादी/सांप्रदायिक/डावे अतिरेकी हल्ले/सीमेपलिकडील गोळीबार आणि खाणी/आईडी स्फोटांमध्ये दगावणाऱ्यांच्या कुटुंबियांना रुपये पाच लाख इतकी समान रक्कम दिली जाईल. अशा घटनांमध्ये शारिरीक दृष्टया 50 टक्के अथवा त्याहून अधिक अक्षम होणाऱ्या व्यक्तींनाही ही भरपाई दिली जाईल.
B.Gokhale/M.Pange/Anagha