पीएम्इंडिया
भारतीय महसूल सेवेतल्या 167 प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या प्रशिक्षणार्थींनी आपल्या कामा दरम्यान देशातल्या लोकांवर विश्वास ठेवावा, असे पंतप्रधानांनी या प्रशिक्षणार्थींशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले. आपल्या देशातील बहुसंख्य नागरीक कायद्याचे पालन करणारे असून देशाच्या हिसासाठी कायद्याचे पालन करणे मान्य करणारे आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारच्या महसूल धोरणाची अंमलबजावणी करतांना आणि आपले कर्तव्य बजावतांना प्रामाणिक करदात्याला त्रास होता कामा नये, असे पंतप्रधान म्हणाले.
सरकारचे लोकाभिमुख उपक्रम लोकांपर्यंत प्राधान्यक्रमाने पोहचतात ना? याबाबत अधिकाऱ्यांनी खात्री करुन घ्यावी असेही पंतप्रधानांनी सांगितले.
या देशातला प्रत्येक नागरीक हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे, असे सर्व अधिकाऱ्यांना वाटले पाहिजे, असे पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना स्पष्ट केले. जर का ही भावना दृढ झाली, तर अधिकारी अधिक जोमाने आणि उत्साहाने काम करतील आणि थकण्याची भावनाही निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या 45 मिनिटांच्या चर्चेदरम्यान, नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असणाऱ्या संवदेनशील आणि मानवतावादी दृष्टीकोनाचे महत्व पटवून देतांना पंतप्रधानांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील तसेच राजकीय अनुभवातील अनेक गोष्टींना उजाळा दिला.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai
A lively interaction with young IRS officers. Emphasised on upholding people's trust in course of their duty. https://t.co/zJfHk7CTVX
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2016