पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आरोग्य सह्कार्यावरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
सामंजस्य करारात पुढील क्षेत्रांचा समावेश आहे:
1. संशोधन आणि विकास, सक्रिय औषधि-विज्ञान घटक (एपीआआय ) आणि माहिती तंत्रज्ञान आधारित वैद्यकीय उपकरण,
2. मनुष्यबळ विकास,
3. आरोग्यसेवा आणि
4. परस्पर मान्यताप्राप्त अन्य क्षेत्र
या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि सहकार्याचे तपशील विस्तृतपणे स्पष्ट करण्यासाठी एक कृतीगट स्थापन केला जाईल.
B.Gokhale/S.Kane/Dinesh