Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि इराण यांच्यातल्या द्विपक्षीय सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


सेबी अर्थात भारतीय प्रतिभूती मंडळ आणि इराणची सिक्युरिटी अँड एक्सचेंज ऑर्गनायझेशन यांच्यात रोखे बाजाराविषयीच्या परस्पर सहकार्याबाबत झालेल्या द्विपक्षीय सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या करारामुळे दोन्ही देशातल्या या नियामक संस्थांमध्ये आर्थिक बंध आणि सहकार्य वृद्धिंगत व्हायला प्रोत्साहन मिळणार आहे. उभय देशातले आणि सेबी आणि एस ई ओ यांच्यातले माहितीचे आदान प्रदान दृढ होण्यासाठीही हा करार उपयुक्त ठरणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Kor