Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कॅनडा यांच्यात उच्च शिक्षणविषयक सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि कॅनडा यांच्यातल्या उच्च शिक्षणविषयक सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

या कराराच्या नूतनीकरणामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातले शैक्षणिक संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे. उभय देशात उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या असलेले संबंध अधिक विस्तारण्याच्या दृष्टीकोनातून तसेच भारत कॅनडाच्या उच्च शिक्षण संस्थांत सहयोगाची मोठी क्षमता लक्षात घेऊन या सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

भारत आणि कॅनडा यांच्यात उच्च शिक्षणात सहकार्य करण्याविषयीचा सामंजस्य करार 2010 मध्ये झाला. हा करार पाच वर्षांसाठी होता. पाच वर्षांची मुदत संपल्यामुळे या कराराचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

N.Chitale/M.Desai