Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कोलंबिया दरम्यान गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि संरक्षणासाठी 10 नोव्हेंबर 2009 रोजी स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारासंदर्भातील संयुक्त घोषणापत्राला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कोलंबिया दरम्यान गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि संरक्षणासाठी 10 नोव्हेंबर 2009 रोजी स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारासंदर्भातील संयुक्त घोषणापत्राला मंजुरी दिली आहे.

या घोषणापत्रामुळे उभय देशांमधील गुंतवणूक संवर्धन आणि संरक्षण संबंधी विद्यमान कराराच्या व्याख्येत स्पष्टता येईल. या संयुक्त घोषणापत्रात गुंतवणूकदाराची व्याख्या, गुंतवणुकीची व्याख्या, योग्य आणि समान वागणूक, राष्ट्रीय व्यवहार आणि सर्वाधिक अनुकूल देशाची वागणूक, स्वामित्वहरण, राज्य तक्रार निवारण तरतूद आणि लाभ नाकारणे यासह अनेक कलमांसाठी संयुक्तपणे स्वीकारायच्या टिप्पणाचा समावेश आहे.

संयुक्त घोषणापत्र सामान्यपणे गुंतवणूक करार व्यवस्थेच्या बळकटीकरणात महत्वपूर्ण पूरक भूमिका पार पाडतात.
*****

N. Sapre/S. Kane