पीएम्इंडिया
रेशीमकिडे आणि रेशीम उद्योग या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळ आणि जपानच्या राष्ट्रीय कृषीजैविक विज्ञान संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य कराराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या उभय संस्थांमध्ये 11 नोव्हेंबर 2016 रोजी सांमजस्याचा करार झाला होता.
भारतातील भौगोलिक हवामानाला मानवतील अशा पद्धतीने संकरीत रेशीम किडयांची जैवसंरचना करण्यासाठी जपान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत भारताला देणार आहे. यामुळे भारतामध्ये संकरीत रेशीमकिडयांची पैदास मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच भारताची रेशीम वस्त्र निर्मितीची आणि ते निर्यात करण्याची क्षमता वाढू शकणार आहे.
या करारामुळे भारतातील वस्त्रोद्योग व्यावसायिक जागतिक दर्जाची रेशमी वस्त्र प्रावरणे उत्पादित करू शकणार आहेत.
N.Sapre/S.Bedekar/D.Rane