पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जपान मधील द्विपक्षीय स्वॅप व्यवस्थेसाठी करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच भारतीय रिजर्व बँकेला बँक ऑफ जपानबरोबर 75 अब्ज डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याचे अधिकार दिले.
ठळक वैशिष्ट्ये:-
स्वॅप व्यवस्था हा भारत आणि जपान यांच्यातील परकीय चलनातील अल्पकालीन कमतरता पूर्ण करण्यासाठी देय शिल्लक समतोल राखण्याच्या उद्देशाने देशी चलनासाठी 75 अब्ज डॉलर्स इतक्या कमाल रकमेचे आदानप्रदान करणारा एक करार आहे.
लाभ:
अडचणीच्या काळात आणि आंतरराष्ट्रीय विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी एकमेकांना मदत करण्याच्या धोरणात्मक उद्दीष्टासाठी भारत आणि जपान यांच्यातील परस्पर सहकार्यांचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही व्यवस्था आहे. यामुळे भारताला ठराविक रकमेचे भांडवल उपलब्ध होईल.
ही व्यवस्था भारत आणि जपान दरम्यान परस्पर आर्थिक सहकार्य आणि विशेष धोरणात्मक भागीदारीतील मैलाचा दगड आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar