Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातल्या ज्ञापन कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली


भारत आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातल्या ज्ञापन कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत माहिती देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीत्व, आग्नेय आशिया क्षेत्रीय कार्यालयाच्या भारतातल्या कार्यालयामार्फत करण्यात आले. नवी दिल्लीत 13 मार्च 2018 रोजी या ज्ञापन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

यामुळे भारत आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातल्या सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे. परिणामी भारतातल्या सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावायला मदत होणार आहे.

***

N.Sapre/N.Chitale/D.Rane